Blogs
Here are some hand picked blogs for you.
'ती' जर्मनीची 'तो' अहमदनगरचा, एका लग्नाची अशीही गोष्ट!
दोन वेगवेगळ्या टोकाला राहणाऱ्या या दोघांचा लग्नसोहळा नुकताच अहमदनगरमध्ये धुमधडाक्यात पार पडला.
December 20, 2018

गणेशने BVSC मध्ये पीएचडी केली आहे तर कॅथरीना देखील MD असून तिची भेट गणेशशी कॉलेजमध्ये शिकताना झाली होती.
काॅलेजमध्ये शिकत असताना झालेली मैत्री कालांतराने प्रेमात बदलली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही आपआपल्या घरच्यांचा याची माहिती दिली आणि घरच्यांनीही दोघांच्या लग्नाला होकार दिली. त्यानंतर गणेशनं आपला लग्नसोहळा हा आपल्या मुळगावी करण्याचं ठरवलं. याला कॅथरीनाने होकारही दिला.
बुधवारी हा विवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. कॅथरीना अगदी भारतीय वधूप्रमाणे नटली होती. तिला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
या लग्नाला जर्मनीहून खास वऱ्हाडही आलं होतं. वधू मुलीकडून अर्थात कॅथरीनाचे 40 नातेवाईक या लग्नसोहळ्याला अगदी भारतीय वेशात सहभागी झाले होते.
भारतीय वेशभूषा परिधान करून कॅथरीनाचे नातेवाईक या लग्न सोहळ्यात सहभागी झाले. या आगळ्यावेगळ्या रूपात विदेशी नातेवाईकांना बघून गावकऱ्यांनी त्यांचा जोरदार स्वागत केलं.
गणेश आणि कॅथरीनाचा भारतीय परंपरेनुसार लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला मोठ्या संख्येनं नातेवाईक आणि गावकरी हजर होते.हिंदू प्रथेप्रमाणे दोघांचाही विवाह सोहळा पार पडला.कॅथरीना ही भारतीय वधू प्रमाणे नटली होती.
आता लग्नानंतर गणेश आणि कॅथरीना परत जर्मनीला जाणार आहेत, या लग्नामुळे दोघांचे घरचे आंनदी आहेत.
